आंबोली सामूहिक बलात्कार: संशयितांना शुक्रवारपर्यंत कोठडी

 Gilbert Hill
आंबोली सामूहिक बलात्कार: संशयितांना शुक्रवारपर्यंत कोठडी

मुंबई - येथील आंबोली परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यावर काही तासांतच पोलिसांनी या प्रकरणी आठ नराधमांना अटक केलीय. "आठपैकी सात जणांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक आरोपी फरार होता. त्यालाही आम्ही पकडलं असून बुधवारी कोर्टात हजर करू. तसंच पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत," अशी माहिती एसीपी अरुण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी संध्याकाळी ही महिला आणि तिचा पती घर बघण्यासाठी अंधेरीतील आंबोली परिसरातील शामनगरमध्ये गेले होते. घर बघण्यासाठी त्यांना एक महिला ब्रोकर मदत करत होती. रात्री उशीर झाल्यानं पती-पत्नी त्या ब्रोकरच्या घरी मुक्कामाला गेले. रात्री उशिरा या घरात आठ जणांनी प्रवेश केला. पीडित महिलेच्या नवऱ्याला बांधून त्याच्यासमोरच सामूहिक बलात्कार करण्यात आला. रास्तेल शेख (19) नागेश धनगर (19) इमरान शेख (23) मोहम्मद खान (23), राकेश खैर (21), जहीर खान (23), इजाज शेख (23) अशी या सात जणांची नावं आहेत.

Loading Comments