ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी अनन्या पांडे गैरहजर, NCBनं...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री अनन्या पांडे हिला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं.

ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी अनन्या पांडे गैरहजर, NCBनं...
SHARES

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री अनन्या पांडे हिला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र सोमवारी अनन्या चौकशीला हजर राहू शकली नाही. ड्रग्ज प्रकरणात अनन्याला आज सकाळी ११ वाजता एनसीबीच्या कार्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

गुरुवारी अनन्याच्या अंधेरी इथल्या घरी एनसीबीनं छापा टाकत तीला समन्स वाजावला होता. त्याच दिवशी तिची चौकशी करण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा अनन्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण तेव्हा देखील ती वेळेवर आली नाही.

अनन्याचं उशिरा येणं NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अजिबात आवडलं नाही. यामुळे त्यांनी तिला फटकारल्याची चर्चा आहे.

ते तिला म्हणाले की, 'तुला सकाळी 11 वाजता बोलावले होते आणि तू आता येत आहेस. अधिकारी तुमची वाट बघत बसणार नाहीत, असं समीर वानखेडे यांनी अनन्याला सांगितलं. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे केंद्रीय एजन्सीचे कार्यालय आहे. तुला बोलावले आहे त्याच वेळी ये.

आज पुन्हा अनन्याला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आज ती एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहू शकली नाही. अनन्या वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकली नसल्याची माहिती मिळत आहे.हेही वाचा

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, चौकशी होणार

नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करणार?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा