समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, चौकशी होणार

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, चौकशी होणार
SHARES

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. शिवाय वानखेडेंना तातडीनं दिल्लीला बोलावलं असल्याची माहिती समोर येत आहे.

वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

क्रुझवरील धाडीत पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील ८ कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते. आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे.

समीर सोमवारीच दिल्लीला रवाना होणार आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्ली पोहोचणार असून दिल्लीत गेल्यावर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. खंडणीच्या अँगलनेच वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलनं प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटींपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

त्यानंतर गोसावीनं मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीनं १० कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसंच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं.

१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटानं गोसावीनं मला फोन केला होता. तसंच २ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते, असा आरोपही त्यानं केला आहे.



हेही वाचा

नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करणार?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण; प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, धक्कादायक व्हिडीओ समोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा