अँकर अर्पिता तिवारी हत्या प्रकरण, आरोपीविरोधात गुन्हा दाखल


अँकर अर्पिता तिवारी हत्या प्रकरण, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
SHARES

अँकर अर्पिता तिवारी मृत्यू प्रकरणी अखेर मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अर्पिताचा बॉयफ्रेंड आणि त्याचा मित्र हे मुख्य संशियत असल्याचं समजतं. सोमवारी मालवणी येथील मानवस्थल इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडून अर्पिताचा मृत्यू झाला होता.


अर्पिता ही आत्महत्या करुच शकत नसल्याचं अर्पिताच्या कुटुंबियांचं म्हणणं असून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांनी वर्तवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.


हत्या की आत्महत्या?

रविवारी मध्य रात्री अर्पिता आपल्या बॉयफ्रेंड पंकज जाधवबरोबर त्याच्या मालवणी येथील घरी गेली होती. घरात पंकज आणि त्याचे मित्र पेइन गेस्ट म्हणून रहायचे. घरी पहाटेपर्यंत पार्टी केल्यानंतर सगळे झोपले. पण सकाळ झाली तरी अर्पिताचा कुठे पत्ता नव्हता. पंकजच्या मित्राने अर्पिता बाथरूममध्ये असल्याचं सांगितलं. मात्र बाथरूमचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत बघितले असता बाथरूममध्ये देखील कोणी नव्हते. शिवाय बाथरूमच्या खिडक्या या काढून ठेवण्यात आल्या होत्या. तिचा शोध घेतल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर अर्पिताचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता.


पोलिसांचा तपास सुरू

अर्पिताचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचं अवलोकन करून प्रत्यक्ष कृतीद्वारे ती घटना उभी करण्याचा प्रयत्न केला. अर्पिताच्या वजन आणि उंचीएवढा एक पुतळा तयार करून तो बाथरूमच्या खिडकीतून फेकण्यात आला. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा