फुगा गिळल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू

रात्री सुमारे १०.३० वाजता देवराज त्याच्या सात आणि तीन वर्षांच्या दोन भावांसोबत घराबाहेर खेळत होता. अचानक तो खोकू लागला. त्यानंतर देवराज याचे वडील सूरज आणि काका राजाराम यांनी तोंडातून फुगा काढण्याचा प्रयत्न केला.

फुगा गिळल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू
SHARES

लहान मुलाच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असते. नकळत त्यांच्याकडून कुठलाही अपघात घडून तो त्यांच्या जिवावर बेतू शकतो. अंधेरीत देखील अशाच एका दुर्घटनेला ४ वर्षाचा मुलगा बळी पडला. फुग्यासोबत खेळताना त्या मुलाने तो गिळाल्याने तो श्वसननलिकेला चिकटला. त्यामुळे मुलाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्याचा मृत्य झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा:- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

देवराज नाग (Devraj Nag) असे या मुलाचे नाव असून आपल्या भावंडांसह घराबाहेर खेळत असताना ही दुर्घटना घडली. चुकून गिळलेला फुगा मुलाच्या श्वासनलिकेला चिकटला आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी मृत्यू ओढावला, असे कूपर हॉस्पिटलमधून देण्यात आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रात्री सुमारे १०.३० वाजता देवराज त्याच्या सात आणि तीन वर्षांच्या दोन भावांसोबत घराबाहेर खेळत होता. अचानक तो खोकू लागला. त्यानंतर देवराज याचे वडील सूरज आणि काका राजाराम यांनी तोंडातून फुगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला तीन वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये नेले. परंतु, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा:-लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज

मुलाच्या घरातल्यांनी दिेलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम देवराज याला अंधेरी येथील पटेल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर Criticare हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला नानावटी रुग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु, नानावटी हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले. Criticare हॉस्पिटलमध्ये नेले त्यावेळेस त्याच्या नाकातून रक्त येत होते आणि त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती, असे घरातल्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यापूर्वी लहान मुलांसोबत खेळताना अनेक दुर्घटना घडल्याचे आपण ऐकले असले. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा