कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार – गृहमंत्री


कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार – गृहमंत्री
SHARES

कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबतमी माहिती दिली आहे

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक याला हरताळ पाळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे. मुंबईत संचार बंदीचे उल्लघंन करणाऱ्या अशा ५६ हजार ८७२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

देशात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नव नवे रुग्ण मुंबईच्या काना कोपऱ्यातून पुढे येत असताना. नागरिकांना मात्र त्याचे कोणतेगी गांभीर्य राहिलेले नाही. या ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत असून अनेक ठिकाणी पोलिसांवरच नागरिकांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे. मात्र अशा बेशिस्त नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आतापर्यंत ५६ हजार ८७२ गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यातील २२ हजार ५३६ जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे. तर २५ हजार ८७२ जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. तर ८७३७ जणांचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा