गृहमंत्री अनिल देशमुखांनी पार्थ पवारांची 'ही' मागणी फेटाळली

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाता तपास सीबीआयला देणार नसल्याचे अनिल देशमुख यांनी पून्हा स्पष्ठ केले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी पार्थ पवारांची 'ही' मागणी फेटाळली
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांनी पार्थ पवार यांची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची तपासणी आम्ही सीबीआयकडे देणार नाही. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे”, असे यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचाः- कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात चौकशी दरम्यान दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. सुशांतने बाँलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा असताना. अचानक सुशांतच्या वडिलांनी  सुशांतच्या आत्महत्येला रिया जबाबदार असल्याचा आरोप करत, बिहारमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार बिहार पोलिसांचे पथक मुंबईला तपासासाठी आले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात ईडीनेही उडी घेत सुशांतच्या बँकेचे डिटेल्स मागवल्याचे कळते. तर बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात रिया चक्रवर्तीने आता सुप्रीम कोर्टात धाव घेत तपासाचे अधिकार मुंबई पोलिसांकडेच रहावेत अशी मागणी केली आहे.आतापर्यंत या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी तब्बल ४१ बड्या हस्तींचे जबाब नोंदवले आहेत. मात्र कोणत्याही निकषापर्यंत पोलिस अद्याप पोहचलेले नाहीत. 

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १२२३ नवे रुग्ण, दिवसभरात ५३ जणांचा मृत्यू

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी होत होती. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, “अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी ही संपूर्ण देश आणि  विशेषत: देशातील तरुणांची भावना आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना अशी विनंती केली आहे कि, ही राष्ट्रीय भावना विचारात घेऊन या प्रकारची सीबीआय चौकशी सुरु करावी”, अशी माहिती पार्थ पवार यांनी स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा