TRP Scam :टीआरपी घोटाळ्यात आणखी एका आरोपीला अटक, आरोपींची संख्या १०वर

आतापर्यंत अटक झालेल्यांपैकी चार ते पाच आरोपींनी चौकशीदरमयान अभिषेकचे नाव घेतले. ग्राहकांना फितवून, पैशांचे आमिष दाखवून कृ त्रिमरीत्या टीआरपी वाढवून घेतलेल्या बहुतांश वाहिन्यांचे पदाधिकारी अभिषेकच्या संपर्कात होते.

TRP Scam :टीआरपी घोटाळ्यात आणखी एका आरोपीला अटक, आरोपींची संख्या १०वर
SHARES

टीआरपी घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. दोनचं दिवसांपूर्वी या घोटाळ्यात अन्य दोन चॅनेलची नावे पुढे आली होती. रविवारी या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिषेक कोळवडे याला अटक केली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

हेही वाचाः- महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस किती? मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांच्या बैठकीत होणार निर्णय

या घोटाळ्यात सुरूवातीपासून अभिषेकचे नाव पुढे येत असल्याने पोलिस त्याच्या शोधात होते. दरम्यान रविवारी अचानक अभिषेकत्याच्या वकिलांसोबत पोलिसांना शरण आला. आज त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील ही दहावी अटक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत अटक झालेल्यांपैकी चार ते पाच आरोपींनी चौकशीदरमयान अभिषेकचे नाव घेतले. ग्राहकांना फितवून, पैशांचे आमिष दाखवून कृ त्रिमरीत्या टीआरपी वाढवून घेतलेल्या बहुतांश वाहिन्यांचे पदाधिकारी अभिषेकच्या संपर्कात होते. वाहिन्या अभिषेकला पैसे देत. अभिषेत त्यातली रक्कम ग्राहकांना फितवणाऱ्या सहकाऱ्यांना वाटे. या आर्थिक व्यवहारांसह अभिषेकने वाहिन्यांसाठी विविध प्रकारची अवैध कामे के ल्याचा संशय गुन्हे शाखेने वर्तवला.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनामुळं १० हजारांपेक्षा अधिक मृत्यू

सुरुवातीपासून विशेष पथक अभिषेकचा शोध घेत होते. मात्र रहस्यमयरीत्या वावरणाऱ्या अभिषेकपर्यंत पोहोचण्यात पथकाला अनेक अडचणी येत होत्या. अटक आरोपींपैकी कोणालाच त्याचे खरे नाव, ठावठिकाणा किंवा संपर्क क्रमांक याबाबत काहीच ठाऊक नव्हते. प्रत्येकाला तो अमीत, अजित, महाडिक अशी खोटी ओळख सांगे. चार ते पाच वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नावे त्याने सीमकार्ड विकत घेतले होते. गुन्हे शाखेने शनिवारी रिपब्लिक, न्यूज नेशन आणि महामूव्हीज वाहिन्यांच्या चालक किं वा मालक आणि संबंधीत व्यक्तींचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाला. हे सर्व वॉण्टेड आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. अभिषेकच्या अटके ने घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या प्रतिनिधींबाबत नेमकी माहिती मिळू शके ल, असा दावा अन्य अधिकाऱ्यांनी केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा