आणखी एका आयपीएस अधिका-याला कोरोनाची लागण

१० दिवसांपासून त्याचा कार्यभार गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उपम यांच्याकडे देण्यात आला आहे.

आणखी एका आयपीएस अधिका-याला कोरोनाची लागण
SHARES

मुंबई पोलिस दलातील आणखी एका उपायुक्ताला कोरोनाची लागण झाली आहे. त्याना कोरोनाची सौम्य लक्षण असल्यामुळे त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन केले आहे.  त्यामुळेच मागील १० दिवसांपासून त्याचा कार्यभार गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उपम यांच्याकडे देण्यात आला आहे. या पूर्वी ही एका आयपीएस अधिकाऱ्याने कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचाः- मुंबईत लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा दाखल

या अधिका-याच्या हद्दीत मोठया प्रमाणात झोपडपट्टी परिसर व सर्वात मोठे कोविड केअर सेंटर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी ते नियमीत या परिसरात जात होते. या दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यातील पोलिसांना ही मोठ्या प्रमाणात कोरोना झाल्याचे पुढे आले होते. मात्र त्या पोलिसांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली. दरम्यान मागील  १० दिवसांपासून त्या अधिकाऱ्याचा कार्यभार गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उपम यांच्याकडे देण्यात आला आहे. यापूर्वी मध्य मुंबईतील एक उपायुक्त, तीन सहाय्यक पोलिस आयुक्त, दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचाः-   मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मध्य रेल्वेने केला मोठा खुलासा

मुंबई पोलिस दलातील २१८० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात ३१४ अधिकारी व १८६६ पोलिस कर्मचा-यांचा समावेश आहे. १३३९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. २३३ कोरोना बाधीत पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने २६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवार व शनिवार दरम्यान २४ तासात चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा