ड्रग्ज तस्करी प्रकरणी विशेष मोहिमेंतर्गत ७ जणांना अटक

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाने शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.

ड्रग्ज तस्करी प्रकरणी विशेष मोहिमेंतर्गत ७ जणांना अटक
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाने शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरूवात केली असून आतापर्यंत ५ ठिकाणी धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली आहे. तर या मोहिमेमुळे ड्रग्ज तस्करांना चाप बसण्याची शक्यता आहे.


एएनसीची विशेष मोहिम

मुंबईसारख्या शहरात महिन्याला ५ मिलियन डाॅलर इतके ड्रग्ज छुप्या पद्धतीने आणलं जातं. या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तस्करांना त्यातून ३०० कोटींचा फायदा होता. तर शहरातील ड्रग्ज तस्करीबाबतची ही उलाढाल पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली असताना. या तस्करांच्या मुस्क्या आवळ्यासाठी मुंबई पोलिसांच्या एएनसी (अंमली पदार्थ विभाग) च्या पोलिसांनी एक विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील काही दिवसांपासून या तस्करांभोवतीचा फास पोलिसांच्या एएनसी विभागाने आवळल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मुंबईतील ५ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली.


कुठे करण्यात आली कारवाई

मुंबई पोलिसांच्या घाटकोपर युनिटने मंगळवारी मानखुर्द जंक्शन येथून राम मुप्पनार (४५), अर्जुन रेठे (३४)या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याजवळ २ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. तर आझाद मैदान युनिटने बुधवारी नागपाडा येथील गोलीराम मैदान परिसरातून राजेश पतसुल (२१) या तस्कराला रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून ६० ग्रॅम एमडी हस्तगत केले. या ड्रग्जची किंमत २ लाख ४० हजार इतकी आहे.

तर वरळी युनिटने इंदीरानगर झोपडपट्टी, भोरा कबर्स्तान पत्रीवाला चाळ येथून नफीस खान (४९) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २१ ग्रॅम एमडी हस्तगत केले आहे. बाजारात या एमडीची किंमत ४२ हजार इतकी आहे. तर शिवडीतून सर्फराज अली खान (३२) याला तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्याच बरोबर कांदीवली युनिटने राजेश वांगे (३८), सूरज जाधव (१९) यांना कुरार व्हिलेज परिसरातून अटक केली असता त्यांच्याकडूनही १ किलो २०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या सर्वांवर मुंबईच्या एएनसी विभागाने एनडीपीआरएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली असल्याचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.


हेही वाचा - 

अंधेरीत कंत्राटदारावर गोळीबार

गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकाला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा