26/11ची पुनरावृत्ती शक्य?


SHARES

शिवडी - शिवडीतील घासलेट बंदरात नांगरून ठेवलेल्या बोटी बेवारस असल्याचा दावा स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. या बोटींनाच घर बनवणाऱ्या माणसांचा अतापता माहीत नसून यात बरेच जण बांग्लादेशी असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. शिवडी बंदराच्या या भागात छोट्या-मोठ्या मासेमारी बोटींप्रमाणेच काही मोठी जहाजंही भंगार म्हणून पडून आहेत. हाकेच्या अंतरावर घासलेट बंदर पोलीस चौकी असली, तरी या बोटी बीपीटीच्या हद्दीत असल्यानं कारवाईबाबत पोलिस सरळ कानावर हात ठेवतायत. मुंबई लाईव्हनं ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर ज्या यंत्रणांवर किनारपट्टी सुरक्षेची मुख्य जबाबदारी असते त्या बीपीटी आणि पोलीस प्रशासन यंत्रणेची भूमिका धक्कादायक अशी होती. सुरक्षा यंत्रणांनी एकदा केलेलं अक्षम्य दुर्लक्ष मुंबईसाठी दुर्दैवी ठरलं. मात्र पुन्हा तशीच चूक करून प्रशासन आणखी एका 26/11 हल्ल्याची वाट पहातंय का असा प्रश्न निर्माण झालाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा