६ तासाच्या चौकशीनंतर अर्जुन रामपाल NCB कार्यालयातून बाहेर


६ तासाच्या चौकशीनंतर अर्जुन रामपाल NCB कार्यालयातून बाहेर
SHARES

बॉलिवूड  अभिनेता अर्जुन रामपाल सकाळी साडे अकराच्या सुमारास  केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी)  कार्यालयात दाखल झाला होता. तब्बल ६ तासाच्या चौकशीनंतर एनसीबीने अर्जुन रामपालला घरी जाण्यास परवानगी दिली. यापूर्वीही रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांची एनसीबीचे चौकशी केली होती. ग्रॅब्रिएला आणि तिच्या भावाच्या अटकेनंतर काही नवे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी रामपालची चौकशी करण्यात आली.

हेही वाचाः- मुंबईत दिवसभरात ५८६ नवे रुग्ण; ११ जणांचा मृत्यू

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCB ने अनेक तस्करांची धरपकड करण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान काँमेडिएन भारती आणि तिचा नवरा हर्ष याच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात पुढे अभिनेता अर्जुन रामपाल यांची मैत्रिण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिच्यावर आणि तिच्या भावावर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर  रामपालने यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी ड्रग्स प्रकरणी आपला काहीही संबध नसल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबी पथकाने छापा ही टाकला होता. त्यात प्रतिबंधीत गोळ्या सापडल्या होत्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने व चिठ्ठीने आपण या गोळ्या घेत असल्याचे त्याने सांगितले होते.

हेही वाचाः- मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप

मात्र NCBच्या चौकशीत संबधित डाँक्टराने दिलेले  औषधांची चिठ्ठी ही रामपालच्या एका ओळखिच्या व्यक्तीला दिली होती. ती त्याने NCB ला स्वत:ला डाँक्टरांना दिल्याचे सांगितले. मात्र ज्या वेळी NCBने  डाँक्चरचा जबाब नोंदवला. त्यात संबधित डाँक्टरने ही कबूली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी रामपाल सोमवारी चौकशीसाठी आला होता.  तब्बल ६ तासाच्या चौकशीनंतर रामपालला NCB ने चौकशीकरून सोडले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा