जेलमध्ये अर्णब वापरत होता फोन, दोन पोलिस निलंबित

त्यामुळेच अर्णवला रायगड येथील कारागृहातून तळोजा कारागृहात त्याला मुक्कामी आणल्याचे सांगितले जाते.

जेलमध्ये अर्णब वापरत होता फोन, दोन पोलिस निलंबित
SHARES

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना रायगड येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी दोन पोलिसांनी अर्णवला कारागृहात मोबाइल फोन वापरण्यास दिल्याचे उघडकीस आल्यानंतर आता या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित कऱण्यात आल्याचे सांगितले जात आहे .

हेही वाचाः-विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी तुरूंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अर्णब यांनी आता सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्यांच्या जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सलग ३ दिवस सुनावणी झाली.

हेही वाचाः-भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून ५ लाख दिव्यांचं वाटप

दरम्यान अर्णवला अटक केल्यानंतर त्याची रवानगी  रायगड कारागृहात करण्यात आली. त्या ठिकाणी अर्णवला दोन पोलिसांनी मोबाइल वापण्यास दिला होता. ही गंभीरबाब उघडकीस आल्यानंतर अर्णवने कुणा कुणाशी संपर्क साधला. याचा पोलिस आता शोध घेत आहेत. मोबाइल फोन देणाऱ्या दोन्ही पोलिसांना आता निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळेच काल अर्णवला रायगड येथील कारागृहातून तळोजा कारागृहात त्याला मुक्कामी आणल्याचे सांगितले जाते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा