मौजमजा करण्यासाठी कॉफी शॉपचे सर्व्हर हॅक

हा गुन्हा कॉपी शॉप मध्ये मित्र मैत्रिणीनसोबत जाऊन मौजमजा करण्यासाठी केल्याचे कबूल केले

मौजमजा करण्यासाठी कॉफी शॉपचे सर्व्हर हॅक
SHARES

मित्र मैत्रीणींशी मौजमजा करण्यासाठी कॉपीशॉपचे सर्व्हर हॅक करून  अकाउंटमधील पैसे काढून फसवणूक करणाऱ्या १७ वर्षीय सीएचे शिक्षण घेणाऱ्या मुलाला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे.

हेही वाचाः- फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!

यातील फिर्यादी यांनी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या कॉपी शॉपच्या अकाउंट मधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लॉग इन करून त्यांच्या कॉपी शॉप च्या गिफ्ट कार्डमध्ये जमा असलेली रक्कम आरोपीने स्वतःच्या गिफ्टकार्ड वळती करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून सायबर क्राईम पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुढील तपासात फिर्यादी यांच्या सह इतर राज्यातील ग्राहकांची देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहितीकॉपी शॉप कंपनी कडून मिळाली.

हेही वाचाः- पाणी जपून वापरा; 'या' भागात २ व ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले संगणकीय साधने, सी सी टीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक बाबींचा तपास करून हा गुन्हा १७ वर्षीय सीए शिक्षण घेणाऱ्या ने केल्याचा उलघडा केला. त्याने हा गुन्हा कॉपी शॉप मध्ये मित्र मैत्रिणीनसोबत जाऊन मौजमजा करण्यासाठी केल्याचे कबूल केले. हा गुन्हा करण्यासाठी त्याने आपली ओळख लपवून इंटरनेट चा वापर केला. हा गुन्हा त्याने सोशल मीडिया तसेच यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहून केल्याचे कबूल केले.  त्याचे वय लहान असल्याने १ वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या तसेच १५ हजार रुपयांच्या  बंध पत्रावर , एनजीओ च्या अधिपत्या खाली समुपदेशन करण्याबरोबरच वर्तुनिकीत सुधारणा करणाबाबत आदेशात करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा