'राजगृह'परिसरात नासधुस करणाऱ्यास कल्याणमधून अटक

आरोपी उमेश याच्या माहितीवरून पोलिसांनी मोरेला कल्याण स्थानक परिसरातून अटक केली आहे.

'राजगृह'परिसरात नासधुस करणाऱ्यास  कल्याणमधून अटक
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या दादर (Dadar)येथील 'राजगृहा'ची काही दिवसांपूर्वी दोन अनोळखी व्यक्तींनी तोडफोड करत, परिसरातील बगीच्यातल्या झाडांची नासधूस केली होती. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी उमेश यादव या माथेफिरूनला अटक केली होती. मात्र राजगृहाच्या खिडक्याची मोडतोड करणारा मुख्य आरोपी फरार होता. त्यास पोलिसांनी कल्याण मधून अटक केली आहे.

हेही वाचाः-धारावीत देशातील पहिले प्लाझ्मा दान शिबीर

दादरच्या राजगृहा (Rajagr̥ha)बाहेर मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी फुलझाडांची नासधूस केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून पळ काढला. या घटनेची माहिती सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणा-या रस्त्यांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी शर्तीच्या प्रयत्ननंतर उमेश यादव या माथेफिरूला अटक केली. मात्र त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता.

हेही वाचाः-कल्याण डोंबिवलीत ४२१ नव्या रुग्णांची नोंद

अखेर माटुंगा पोलिसांनी (Matunga police)शर्तीच्या प्रयत्ननंतर त्याला कल्याण परिसरातून अटक केली आहे. विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या(२०) असे अटक आरोपीच नाव आहे. आरोपी उमेश याच्या माहितीवरून पोलिसांनी मोरेला कल्याण स्थानक परिसरातून अटक केली आहे. आरोपी त्यात परिसरात फुटपाथवर राहणारा आहे. चौकशीत त्याने गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४४७ व ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा