आकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद

ऐकीकडे सरकार ओरडून ओरडून नागरिकांना कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सांगत असताना. दुसरीकडे पोलिसांसाठी सुरू असलेली सेंटर बंद करत असल्याने पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना. याचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या पोलिसांना बसला. पोलिस दलात आतापर्यंत २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबई पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून मुंबई पोलिस दलात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात येत नाही, तोच मुंबई पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेली २ कोविड सेंटर बंद करण्यात आली आहे. ऐकीकडे सरकार ओरडून ओरडून नागरिकांना कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सांगत असताना. दुसरीकडे पोलिसांसाठी सुरू असलेली सेंटर बंद करत असल्याने पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचाः- सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे

कोरोनाचे संक्रमण सर्वत्र असताना देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईसह इतर जिल्ह्यातील पोलिस हे रस्त्यावर उभे होते. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्याने महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले. महाराष्ट्र पोलिस दलातील २१ हजार ९८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यातील १८ हजार ३७२ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर ३ हजार ३८१ पोलिसांवर आजही उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३५ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईतले सध्या ४०१ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन सरकारने पोलिसांसाठी अँटीजीन टेस्ट केली. तसेच कोरोना न होण्यापासून लागणारी सर्व साहित्य उपल्ब्ध केली. तसेच पोलिसांसाठी विशेष कोविड सेंटर उभारली.  त्यामुळेच की काय पोलिसांमध्ये वाढणारे कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आले.

हेही वाचाः-   २ आठवड्यात उत्तर द्या, भिवंडी दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारसह महापालिकांना नोटीस

मात्र खुद्द सरकारकडूनच नागरिकांना धोका अजून टळला नसून नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या जात असताना. दुसरीकडे मात्र पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेली २ विशेष कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यात बाधीत पोलिसांचा आकडा कमी झाल्यामुळे मरीन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखाना व मरोळ येथील एक कोविड केअर सेंटर तात्पुर्त्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोनही कोविड केअर सेंटर पूर्ण तयारीत असून उद्या जरी कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा वाढला, तरी तात्काळ ही सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील. उपलब्ध स्त्रोतांचा वापर योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीने सध्या गरज नसल्यामुळे ही सेंटर बंद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार चौकशी

सध्या मुंबई पोलिस दलातील ५ हजार ८३१ पोलिसांचा कोरोनाची लागण झाली असून त्यातील ८० पोलिांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत पाच हजार १७० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील ७० टक्के पोलिस कामावर रुजूही झाले आहेत. मे-जून महिन्यात मुंबईतील कोरोनाबाधीत पोलिसांचे प्रमाण सर्वाधीक होते. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कमी आल्याचे पहायला मिळाले. मात्र सध्या कोरोनाचे संक्रमण पून्हा वाढू लागले आहे. त्यामुळे ही बंद कोविड सेंटर सुरूच ठेवायला हवीत असे अनेकांचे मत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा