दादरा आणि नगर हवेलीचे काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. मनसुख हिरेन यांच्यासोबतच डेलकर यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून भाजपने सरकारला कोंडीत पकडलं. मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.
“दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत येऊन आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास देण्यात येत होता. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.
हेही वाचा- मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला
डेलकर यांच्या पत्नी कलाबेन मोहन डेलकर, अभिनव मोहन डेलकर यांनीही हेच आरोप केलेले आहेत. त्यामुळे मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
छत्तीसगढमधील आयएएस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरमध्ये येऊन आत्महत्या केली. त्यांचाही तोच उद्देश असावा, की त्यांना तिथल्या भाजप सरकारकडून न्याय मिळणार नाही, असं वाटत होतं, असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला.
(ATS will form for inquiry in congress mp mohan delkar suicide case says maharashtra home minister anil deshmukh)