दाऊदच्या वडिलोपार्जित ६ जमिनींचाही लिलाव

दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही घेण्यात आला. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अधिक किंमतीमुळे त्यात कोणीही उस्तुकता दाखवली नाही.

दाऊदच्या वडिलोपार्जित ६ जमिनींचाही लिलाव
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सहा वडिलोपार्जित मालमत्तांची विक्री स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) यांनी केली. या सर्व मालमत्ता रत्नागिरीतील होत्या. दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांच्या किंमतीमुळे मात्र पुन्हा एकदा  कोणतीही उत्सुकता दाखवली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रथमच ई-ऑक्शनद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.

हेही वाचाः- गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

दाऊदच्या कुटुंबियांशी संबंधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे या मालमत्ता आहेत. त्यातील सहा मालमत्ता मुम्बाके या गावात आहेत. त्यात २७ गुंठे जमीन, २९.३० गुंठे जमीन, २४.९० गुंठे जमीन, २० गुंठे जमीन, १८ गुठे जमीन तसेच २७ गुठे जमिनीसह एक घर अशा सहा मालमत्ता आहेत. याशिवाय खेड परिरातच लोटे येथेही ३० गुंठ्यांची एक जागा आहे. त्यातील सहा मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यात सर्वे क्रमांक १८१(२७गुंठे जागा व दोन घरे) मालमत्तेचाही समाभाग आहे. त्या बंगल्याची मूळ किंमत पाच लाख ३५ हजार रुपये ठेवण्यात आली होती. लिलावात ही मालमत्ता ११ लाख २० हजार रुपयांना विकली गेली. अजय श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ही मालमत्ता खरेदी केली. श्रीवास्तव याने त्यासोबत खेड येथील मुम्बाकेमधील १५३ सर्वे क्रमांकाची मालमत्ताही खरेदी केली. २४.९० गुंठ्याच्या या मालमत्तेची मूळ किंमत  एक लाख ८९ हजार निश्चित करण्यात आली होती. लिलावात तीन चार लाख तीन हजार रुपयांना विकली गेली. खेड येथील मुम्बाके येथील सर्वे क्रमांक १५० (२० गुंठा- मूळ किंमत एक लाख ५२ हजार रुपये) सर्वे क्रमांक १५१ (२७ गुंठा- मूळ किंमत दोन लाख पाच हजार रुपये), सर्वे क्रमांक  १५२ (२९.३० गुंठा- मूळ किंमत दोन लाख २३ हजार रुपये)) व  सर्वे क्रमांक  १५५ (१८ गुंठा-मळ किंमत  एका लाख ३८ हजार रुपये) या सर्व मालमत्ता दिल्लीचे रहिवासी तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकील भुपेंद्र भारद्वाज यांनी एकूण सात लाख १८ हजार रुपयांना खरेदी केल्या. दाऊदच्या एकूण सात मालमत्तांची विक्री करण्यात येणार होती. पण खेड येथील लोटे परिसरातील ३० गुंठा जमीन(पेट्रोलपंप) व इमारत ही सर्वे क्रमांक८१ या मालमत्तेचा लिलाव शेवटच्या क्षणाला तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला.

हेही वाचाः- मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी

दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही घेण्यात आला. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अधिक किंमतीमुळे त्यात कोणीही उस्तुकता दाखवली नाही. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला  सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव आयोजीत करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नव्हती सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये ५०१ व ५०२ हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १२०० चौ.फुट आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा