परदेशी नागरिकाचं १० लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी १२ तासात दिलं शोधून

एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचं १० लाखांचं हरवलेलं सामान मुंबई पोलिसांनी शोधून दिलं. यामुळे सध्या मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

परदेशी नागरिकाचं १० लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी १२ तासात दिलं शोधून
SHARES

अनेकदा मुंबई पोलिसांच्या कामावर बोट उचललं जातं. पण यावेळी मात्र पोलिसांनी केलेल्या कामगिरी सातासमुद्रापार पोहोचली आहे. एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचं १० लाखांचं हरवलेलं सामान मुंबई पोलिसांनी शोधून दिलं. यामुळे सध्या मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

एडम जॅक्शन नावाचा ऑस्ट्रेलियन नागरिक काही कामानिमित्त मुंबईत आला होता. गोरेगाव इथल्या हॉटेल फर्नमध्ये हा नागरिक थांबला होता. शुक्रवारी रात्री १० वाजता त्यानं हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी पकडली. यावेळी एडम टॅक्सीतच आपलं १० लाखांहून अधिक रकमेचं सामान विसरला. हॉटेलवर पोहोचल्यावर एडमला सामान टॅक्सीतच विसरल्याचं आठवलं. या सामानात लॅपटॉप, कॅमेरा, लेन्स आणि घड्याळ होतं

आपलं सामान मिळेल अशी आशा एडमला नव्हती. घडलेला प्रकार त्यानं हॉटेलच्या मॅनेजरला सांगितला. मॅनेजरनं एडमला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एडमनं वनराई पोलिस ठाण्यात याबाबत कायदेशीर तक्रार नोंदवली

पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी टॅक्सीचा नंबर मिळवला. त्यावरून टॅक्सी चालकाचं नाव आणि पत्ता शोधून काढला. पण टॅक्सी चालक कुलाबा परिसरात राहयला गेल्याचं कळालं. कुलाबा पोलिसांच्या मदतीनं टॅक्सी चालकाला शोधून संपूर्ण सामान एडमला सुपूर्त केलं. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सामान मिळालं. यासाठी एडमनं मुंबई पोलिसांचं कौतुक केलं



देशाची आर्थिक राजधानी नशेच्या विळख्यात, १९ महिन्यात १०७३ जणांना अटक

इकबाल मिर्चीच्या संपत्तीच्या लिलावास तुर्तास स्थगिती


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा