बाबा मुरुगन टोळीचा पर्दाफाश


बाबा मुरुगन टोळीचा पर्दाफाश
SHARES

मालाड - दरोडेखोर बाबा मुरुगन आणि त्याच्या गँगच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दिंडोशी पोलिसांनी या चोरांना सापळा रचून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा मुरुगन ही टोळी अत्यंत चलाखीने चोरी आणि लूट करणारी टोळी आहे. बाबा मुरगन याचं पूर्ण नाव नारायण इशकी तेवर उर्फ मुरुगन असं आहे. जो मूळचा रायगडमधला रहाणारा आहे. 

21 मार्चला रात्रीच्या दरम्यान या टोळीने एका मोबाइलच्या दुकानाचं शटर तोडून 6 लाखांहूनही अधिक किमतीचे मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक सामानांची चोरी केली. त्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर दुकान मालक उत्तम सिंह यांनी या प्रकरणी 22 मार्चाला दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर दिंडोशी पोलीस ठाण्यातील पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांना मुरुगन बाबा टोळाचा सुगावा लागला.

तर दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रशांत निशानदार यांनी सांगितले की, राणी सत्ती मार्ग इथे असलेल्या मारुती टेलिकॉम नावाच्या एका मोबाइल दुकानात झालेल्या चोरीच्या आरोपाखाली मुरुगनसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून 36 मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा