मोबाईल विसरला अन् जाळ्यात सापडला...


मोबाईल विसरला अन् जाळ्यात सापडला...
SHARES

वांद्रे इथे २०१३ मध्ये नलिनी चैनानी या ५५ वर्षीय महिलेची दोघांनी निर्घृण हत्या केली होती. कुणालाही शंका येणार नाही, या पद्धतीनं नलिनी यांनी हत्या करण्यात अाली होती. अखेर या हत्येचा उलगडा घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलमुळं लागला अाहे. मूक-कर्णबधीर असलेल्या अारोपींपैकी एक आरोपी आपला मोबाईल नलिनी यांच्या घरीच विसरला होता. त्या संशयास्पद मोबाईलमुळेच अारोपींचा छडा लागला. तब्बल ५ वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यामध्ये न्यायालयानं नुकतीच दोन्ही अारोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


हत्या करून ६ लाख लुटले

वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील मधुबन इमारतीच्या दहाव्या माळ्यावर राहणाऱ्या नलिनी चैनानी यांचा मृतदेह ११ जून २०१३ रोजी रक्ताच्या थारोळ्यात अाढळला होता. नलिनी यांची हत्या करून ६ लाख रुपयांचे मौल्यवान साहित्य चोरून नेले होते. सराईत चोरांनी ही हत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना वाटला होता. पण घरातील टेबलावर एक संशयित मोबाईल पोलिसांना अाढळला. त्यात चैनानी यांना मारण्याच्या कटासंदर्भात संभाषणे अाढळून अाली. त्यानंतर ही हत्या चैनानी यांच्या मुलाच्या मित्रांनीच केल्याचं निष्पन्न झालं.


एकट्या असल्यानं डाव साधला

परवेझ खान हा वांद्रेतील एका जिममध्ये ट्रेनरचं काम करायचा. त्याच्या परिचयातूनच चैनानी यांची सैफराजा भावनगरीशी अोळख झाली होती. त्यामुळे दोघांचे चैनानी यांच्या घरी येणं-जाणं असायचं. ११ जून रोजी ते घरी अाले असताना अंजली एकट्याच असल्याचं बघून त्यांनी अापला डाव साधला अाणि अंजली यांची हत्या केली. त्यानंतर या हत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या पथकाने सैफराजा भावनगरी अाणि परवेझ खान यांना अटक केली होती.


दोघांना जन्मठेपेची शिक्षा

दोघेही अारोपी मूक-कर्णबधीर असल्यानं खटला चालवणं सरकारी पक्षासह न्यायाधीशांसाठी मुश्किलीचं बनलं होतं. अखेर वांद्रे येथील अली यावर जंग इन्स्टिट्यूटमधील दूभाषिकाची मदत घेऊन या दोघांना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सातवले कर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


हेही वाचा - 

मुंबईला हादरवणारा 'इंडियन लादेन' अखेर गजाआड

तेल माफियांचा पर्दाफाश


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा