भाजप नेते मोहित कंबोजसह चौघांवर ‘सीबीआय’ने नोंदवला फसवणुकीचा गुन्हा

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१८ च्या दरम्यान फोर्ट येथील बँक ऑफ इंडियाच्या मिड कॉ्रपोरेट ब्रांच येथे ही फसवणूक झाली. याप्रकरणी काही बँक अधिका-यांवरही संशयाची सुई आहे.

भाजप नेते मोहित कंबोजसह चौघांवर ‘सीबीआय’ने नोंदवला फसवणुकीचा गुन्हा
SHARES

मुंबईतील एका भाजप नेत्यावर बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मोहित कंबोज असे या भाजप नेत्याचे नाव असून त्याच्यासह चौघांचा या घोटाळ्यात संबध असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या नेत्यासह आरोपींनी बँक ऑफ इंडियाची ५७ कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयने केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबईत पाच ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात असून कंबोज यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण वन टाईम सेटलमेंटअंतर्गत ३० कोटी रुपये बँकेला २०१८ मध्ये भरल्याचे कंबोज यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

हेही वाचाः- मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून याप्रकरणी सीबीआयने मे. अव्यान ओव्हरसिज प्रा. लि.(सध्याची बाग्ला ओव्हरसिज प्रा.लि.) व त्याचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज,जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बाग्ला, इर्तेश मिश्रा(चौघेही खासगी कंपनीचे संचालक) व केबीजे हॉटेल्स गोवा प्रा.लि. यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१८ च्या दरम्यान फोर्ट येथील बँक ऑफ इंडियाच्या मिड कॉ्रपोरेट ब्रांच येथे ही फसवणूक झाली. याप्रकरणी काही बँक अधिका-यांवरही संशयाची सुई आहे. आरोपींनी कट रचून फॉरेन बिल्स निगोसिएशन, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिटच्या नावाखाली ६० कोटी रुपये मंजूर करून घेतले. ती रक्कम मंजूर करण्यासाठी तसेच मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. तसेच त्याचा वापर दुस-या कामांसाठी करण्यात आला. त्यामुळे बँकेला ५७ कोटी २६ लाख रुपयचे नुकसान झाले, असा आरोप आहे.

हेही वाचाः- एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

याप्रकरणी मुंबईतील पाच ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली आहे. त्यात आरोपींचे घर व कार्यालय तसेच खासगी कंपनी यांचा समावेश आहे. या कारवाईत मालमत्ता, कर्ज, बँक खात्याची माहिती व लॉकरच्या चाव्या असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. याबाबत कंबोज यांच्याशी संपर्क साधला असता, २०१८ मध्ये एक रकमी तडजोडी अंतर्गत या कर्जाबाबत ३० कोटी रुपये भरले आहेत. याबाबत मला मार्च, २०१९ मध्ये बँकेने नो ड्यूज सर्टीफिकेटही दिले होते. त्यामुळे कर्जाची रक्कम फेडल्यानंतर अडीच वर्षांनी बँकेने याप्रकरणी का तक्रार केली, हे समजत नाही. त्यांच्याकडून चूक झाली आहे. तरी मी सीबीआयच्या तपासाला सहकार्य करत असून मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे कंबोज यांनी सांगितले.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा