या 'फटका' गँगपासून तुम्हीही सतर्क राहा!

या 'फटका' गँगपासून तुम्हीही सतर्क राहा!
या 'फटका' गँगपासून तुम्हीही सतर्क राहा!
See all
मुंबई  -  

चालत्या गाडीतून प्रवाशांचे मोबाइल आणि त्यांच्या सामानावर निशाणा साधणाऱ्या 'फटका गँग'चे नाव तर आपण सर्वांनी ऐकलेच असेल. एेकले नसेल तर, सावधान व्हा. कारण लोकलमध्ये दवाजात उभे राहून हातात मोबाइल असणाऱ्या प्रवाशांना ही गॅंग काही क्षणात सावज बनवते. 'मुंबई लाइव्ह'वर त्यांचे फोटो आणि कारनामे देखील पाहू शकाल.

कुर्ला रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एकवरील लोकल सुटताना या फटका गँगमधील सदस्याने दारावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला धक्का दिला. त्यानंतर त्या प्रवाशाचा मोबाईल जसा खाली पडतो तोच आपली चूक असल्याचे दाखवत ट्रेन सुटल्यानंतर मोबाईल उचलून पळ काढला. पण आरपीएफच्या दोन अधिकाऱ्यांना ही चलाखी समजली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी फटका गँगसाठी काम करत होते. सध्या पोलीस त्यांच्याबद्दल अधिक तपास करत आहेत. या गँगने किती प्रवाशांचे मोबाईल चोरले आहेत त्याचा देखील उलगडा होईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

खरेतर फटका गँग दोन प्रकारच्या आहेत. यामधील एक गँग लाकडी दांड्याचा वापर करतात आणि दुसरी गँग फक्त हातानेच प्रवाशांच्या मोबाईल आणि त्यांचे सामान पळवतात. पण हातचलाखीने कशा प्रकारे ही दुसरी फटका गँग प्रवाशांच्या वस्तू पळवते आणि यांच्यापासून कसे सतर्क राहिले पाहिजे, त्याबद्दल नक्कीच तुम्हाला मदत होईल.

[हे पण वाचा - प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाले]

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.