क्लोरोफॉर्म टोळीपासून सावधान


क्लोरोफॉर्म टोळीपासून सावधान
SHARES

एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या एका सराईत टोळीचा रेल्वे एसटीएफने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एसटीएफने साहिल अहमद अब्दुल रेहमान मंसुरी (33) आणि नीरज उमाशंकर रावत (29) नावाच्या दोन चोरट्यांना जेरबंद केल असून 6 गुन्हे सोडवल्याचा दावा केला आहे.

साहिल अहमद आणि नीरज हे दोघे त्याचा अन्य एक  साथीदार दीपक सोनीसोबत लांब पल्ल्याच्या गाडीत चढून श्रीमंत प्रवाशांना  लक्ष्य करत होते. सुरुवातीला ते एकट्या प्रवशाला हेरतात, त्यानंतर त्यांच्याशी मैत्री करतात. मैत्री होताच त्याना गूंगीचे औषध मिसळून खायला देतात. त्यांनी दिलेला खाऊ खाताच प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर संधी मिळताच हे त्या प्रवाशाकडील सगळा ऐवज घेऊन लंपास होत असत.

फेब्रुवारी महिन्यात हाप्पा गाडिने मुंबईला येणाऱ्या धनकराजन केश्वानी (70) नावाच्या प्रवाशाला या टोळक्याने गुंगीचे औषध मिसळलेला उपमा खायला देऊन लुबाडलं. त्यावेळी त्यांच्याकडील पैसे आणि एटीएम कार्ड घेऊन हे तिघे पसार झाले. त्यानंतर त्या एटीएम कार्ड द्वारे या तिघांनी 2 लाख 81 हजारांची शॉपिंग देखील केली. मात्र तिथेच हे फसले. एटीएमच्या व्यवहारावरून ते दादरमधील त्रिकूट हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तोपर्यंत फार उशीर झाला होता. हे तिघे झाशी येथील आपल्या गावी निघुन गेले होते. त्यानंतर एसटीएफचे पथक झाशीला रवाना झाले आणि या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांचा साथिदार दीपक सोनी मात्र अद्याप फरार आहे. या दोघांकड़ून एसटीएफने पनवेल डोंबिवलीसह वसई आणि पालघरचे प्रत्येकी दोन असे ऐकूण सहा गुन्हे सोड़वले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा