भोसरी एमआयडीसी व्यवहाराची ईडी तपासणी करणार


भोसरी एमआयडीसी व्यवहाराची ईडी तपासणी करणार
SHARES

 माजी माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडी)समन्स पाठवले असून भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहाप्रकरणी अधिक माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या अ‍ॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड

खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याला ईडी लावली, तर आपण सीडी लावू, असे म्हटले होते. त्यानंतर आता दोन महिन्यानंतरच ईडीने मनी लाँडरींगप्रकरणी त्यांना समन्स बजावले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील एका व्यावसायिकाने केला होता. तक्रारीनुसार या जमीनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांमध्ये खडसेंच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८ मध्ये एसीबीने केलेल्या तपाात खडसे यांना क्लीनचीट देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातूनही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचाः- बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोना संक्रमणात उल्लेखनीय घट

ईडी आता याप्रकरणी मनी लाँडरींगप्रकरणी झाली आहे का, याबाबत तपास  करणार आहे. गुन्ह्यांत सहभागी मालमत्तेतील काळा पैसा पुन्हा बाजारात फिरवण्यात आल्याबाबत तपास करण्याचा अधिकार ईडीला आहे. जून्या गुन्ह्यांच्या आधारावर प्रोव्हीजन ऑफ द प्रीव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरींग अंतर्गत ईडी अशा प्रकरणात तपास करते. याबाबत ईडीचे संचालक एस.के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता खडसे यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा