Bigg Boss फेम अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टीमध्ये अटक

स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते.

SHARES

नाशिक (nashik) मधील इगतपुरीत (igatpuri) हाय प्रोफाईल रेव्ह पार्टी (rave party) वर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी  २२ जणांना अटक केली आहे. यामध्ये बिग बॉस मराठी (Bigg Boss marathi) फेम अभिनेत्री हीना पांचाळचा (actress Heena Panchal) समावेश आहे. मलायका अरोराची लूक-अलाईक अशी हीनाची ख्याती आहे.

शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली आहे.  

स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.

पोलिसांनी यावेळी २२ जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसंच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्यांमध्ये १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.

हीना पांचाळ ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता.  हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसंच हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रियालिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा