‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं

विशेष म्हणजे ती व्यावसायानिमित्त परदेशात असाताना, चोरट्यांनी ही चोरी केल्याचे कळते.

‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं
SHARES

देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या पालोनजी शापूरजी मिस्त्री ग्रुपच्या प्रमुखांच्या मुलीच्याच खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला (Cyber Crime) मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ती व्यावसायानिमित्त परदेशात असाताना, चोरट्यांनी ही चोरी केल्याचे कळते. या प्रकरणी कुलाबा पोलिस (Culaba police station) ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह

उद्योगपती पालोमजी शापूरजी मिस्त्री यांच्या लैला रुस्तम जहांगीर(६२) या कन्या आहेत. लैला या व्यवसायानिमित्त सध्या दुबईत वास्तव्याला आहेत. त्याचे बँक खात्याचे आर्थिक व्यवहार करण्याचा कायदेशीर अधिकार त्यांनी मँन्डेट होल्डर अर्ज वरुन त्याचे वडील नामे पालोनजी शापूरजी मिस्त्री यांना दिलेले होते. मात्र पालनजी हे वयोव्रुद्ध झाल्याने २०१८ मध्ये या खात्याचे आर्थिक व्यवहार करण्याचे कायदेशीर अधिकार लैला यांनी कंपनीचे संचालक फिरोज कावशहा भाठेना यांना देण्यात आले. लैला जहांगीर या परदेशी रहात असल्याने व परदेशात भारतीय मोबाईल क्रमांक चालत नाही. त्यामुळे १० वर्षापासुन त्यांच्या सांगण्यावरुन या बॅक खाते तक्रारदार जयेश मर्चंट यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्यात आले होते.

हेही वाचाः- पुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज

१ जूनाला मर्चंट यांच्या मोबाइलवर लैला यांच्या खात्यातून एका मागोमाग एक १० हजार काढल्याचे चार मेसेज आले. कामात व्यस्त असल्याने त्यांचे त्यावर लक्ष गेले नाही. मात्र पुन्हा दुपारी त्याच बॅक खात्यातून १० हजार रुपये चारवेळा काढल्याचा संदेश आला. त्यावेळी मर्चंट यांचे मोबाइलवर लक्ष गेले. आपण कुठल्याही व्यवहाराकरता पैसे काढले नसताना. हे ८० हजार काढले कुणी हा प्रश्न मर्चंट यांना पडला. त्यांनी तातडीने याबाबत फिरोज भाठेना यांचाकडे चौकशी केली. परंतु त्यांनीही सदरची रक्कम काढली नसल्याची सांगीतले त्यानंतर तक्रारदाराने बँकेत चौकशी केली. त्यावेळी या खात्यातून विविध ठिकाणी खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे २०१८ मध्ये भाठे यांच्या नावाने या खात्यावरून डेबिड कार्ड जारी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच ते कंपनीच्या कुलाबा येथील कार्यालयाच्या पत्त्यावर कुरिअर करण्यात आले होते. पण भाटे व मर्चंट यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. याच डेबिट कार्डच्या सहाय्याने ही फसणूक करण्यात आल्याचा संशय आहे. अखेर याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय