आता गुन्हेगार सुटणं निव्वळ अशक्य!


आता गुन्हेगार सुटणं निव्वळ अशक्य!
SHARES

मुंबई पोलिसांची तुलना ही नेहमीच स्कॉटलंड यार्डशी केली जाते. मुंबई पोलिस आपल्या नावारुपाप्रमाणे साजेशी कामगिरी करतात देखील. खतरनाक गुंडांना ते पकडतात, संघटित गुन्हेगारीला आळा घालतात. पण कित्येकदा त्यांची ही मेहनत निष्फळ ठरते. अनेकदा कैदी जेलमधून पसार होतात तर, कधी पॅरोल किंवा फर्लोवर बाहेर आल्यावर पुन्हा जेलमध्ये परततच नाहीत. मग ते आपले नाव बदलून नव्याने गुन्हे करतात. ज्यामुळे त्यांचा पूर्वीचा इतिहास पुसला जातो. पण आता हे सगळं बदलणार आहे.

मुंबई पोलिस सध्या एका अशा अद्ययावत सिस्टीमचा वापर करत आहेत, ज्यामुळे संपूर्ण चित्रच पालटून जाणार आहे. आरोपीला पकडल्यानंतर या सिस्टीमकडे सोपवले की, त्याची सगळी कुंडलीच तपास अधिकाऱ्याला मिळणार आहे आणि ती देखील अगदी क्षणार्धात!


एबीएमआयएस प्रणाली आहे तरी काय?

ऑटोमेटेड बायोमेट्रिक आइडेंटिफिकेशन सिस्टम (एबीएमआयएस) या प्रणालीमध्ये एक डेस्कटॉप कंसोल म्हणजेच संगणक प्रत्येक पोलिस ठाण्यात दिला आहे. या कंसोलसमोर गुन्हेगाराला बसवले, की आधी त्याचा फोटो काढला जातो. त्यानंतर अद्ययावत पद्धतीने त्याच्या बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जातात. जर त्या आरोपीची काही गुन्हेगारी पर्श्वभूमी असेल, तर ती लगेच समोर येते. त्यानंतर ही सगळी माहिती आरोपीच्या इतर माहितीसह मुंबई पोलिसांच्या मेन सर्व्हरवर कायमची सेव्ह केली जाते.

कित्येकदा सराईत गुन्हेगार आपले नावच नव्हे, तर चेहराही बदलतात. अशा वेळी सत्य शोधून काढणं कठीण होऊन जातं. पण आता या प्रणालीमुळे अगदी क्षणार्धात आरोपीची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिसांना कळणार आहे. अशा वेळी गुन्ह्याचा तपास तर सोपा होतोच, पण कोणत्या गुन्ह्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहे, हे देखील पोलिसांना लगेच समजते.

आतापर्यंत या सिस्टीमद्वारे हजारो आरोपींचा डेटा गोळा करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अजूनही ही सिस्टीम अपडेट करत असून नुकतेच या सिस्टीमला अपग्रेड करण्यात आले आहे. त्याचबरोबर एम-टॅड आणि एमटीडी नावाच्या प्रणालींचा देखील त्यात समावेश करण्यात आला आहे.

देशभरात ‘क्राईम अँन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम’ (सीसीटीएनएस) सारखा प्रोजेक्ट लागू करण्यास केंद्र सरकार आग्रही आहे. ज्यात गुन्ह्याच्या प्राथमिक अहवालाच्या नोंदणीपासून (एफआयआर) ते कित्येक कामे ही थेट ऑनलाइन होणार आहेत. असे असताना मुंबईत एबीएमआयएस ही प्रणाली आता सीसीटीएनएस या प्रोजेक्टच्या जोडीला काम करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

पोलिसांना मिळणार पुरावे गोळा करण्याचं ट्रेनिंग

सायबर गुन्हे रोखण्यासाठी 'सिंघम'चा पुढाकार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा