खंडणीसाठी भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण


खंडणीसाठी भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण
SHARES

खंडणी न दिल्यामुळं हॉटेल मालकाला भाजपाच्या नगरसेवकानं मारहाण केल्याची घटना नवी मुंबईतील खारघरमध्ये घडली. भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी खारघरमधील सेक्टर ४ येथील नवीन हॉटेलचे मालक इमतिहाज शेख (४१) यांना ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, शेख यांनी खंडणी देण्यास नकार दिला.



अारोपींना अटक

खंडणी देण्यास नकार दिल्याने शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नगरसेवक शत्रूघ्न काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह हॉटेल मालक इमतिहाज शेख यांना मारहाण केली. या मारहाणीत इस्माईल यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली अाहे. त्यांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी नगरसेवक शत्रूघ्न काकडे अाणि कार्यकर्त्यांना अटक केली अाहे.  नगरसेवक शत्रुघ्न काकडे हॉटेल मालक इमतिहाज शेख यांच्याकडे वारंवार खंडणीची मागणी करत होते. मात्र, शेख यांनी खंडणी देण्यास नकार दिला होता.



हेही वाचा -

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अपुरे पोलिस दल

मुलाच्या रडण्याला वैतागून आईनंच केली मुलाची हत्या



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा