खंडणीच्या आरोपाखाली भाजपा नेत्याला अटक

ठाणे आणि मुंबईत काही आरटीआय कार्यकर्ते खंडणीखोरीचं रॅकेट चालवत असल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ महिन्यांअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. याप्रकरणी तपास केल्यावर बर्गे, मुलानी आणि इराकी या तिघांची नावं समोर आली.

खंडणीच्या आरोपाखाली भाजपा नेत्याला अटक
SHARES

ठाण्यातील भारतीय जनता पक्षा (भाजपा)चे नेते सुधीर बर्गे यांना नामांकीत बिल्डर हिरानंदानी यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बर्गे यांच्यासोबत आणखी माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी आणि आरिफ इराकी अशा २ आरोपींनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक

सुधीर बर्गे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक देखील आहेत. २००७ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सद्यस्थितीत ते भाजपात कार्यरत आहेत.

खंडणीखोरीचं रॅकेट

ठाणे आणि मुंबईत काही आरटीआय कार्यकर्ते खंडणीखोरीचं रॅकेट चालवत असल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ महिन्यांअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. याप्रकरणी तपास केल्यावर बर्गे, मुलानी आणि इराकी या तिघांची नावं समोर आली.

हे तिघेही आरटीआयच्या माध्यमातून माहिती मिळवत संबंधितांकडून पैशांची वसुली करत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा- 

बोगस जामिनदारांमार्फत आरोपींना तुरूंगाबाहेर काढणारी टोळी गजाआड

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा