बीएमसीची सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार, 'हे' आहे कारण

लॉकडाऊनदरम्यान गरिबांच्या मदतीसाठी चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद याच्याविरोधात आता मुंबई महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बीएमसीची सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार, 'हे' आहे कारण
SHARES

लॉकडाऊनदरम्यान गरिबांच्या मदतीसाठी चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद याच्याविरोधात आता मुंबई महापालिकेने  जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा मुंबई महापालिकेचा आरोप आहे.

पालिकेने ४ जानेवारी रोजी ही तक्रार दाखल केली आहे. महापालिकेने तक्रारीत म्हटलं आहे की, जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केलं आहे. सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केल्याचं निर्दशनास आलं आहे. 

दरम्यान, सोनू सूदने आपल्याकडे महापालिकेची परवानगी असून महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. सोनू सूदने म्हटलं की,  मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन. मी पालिकेच्या तक्रारीविरोधात हायकोर्टात जाणार आहे.

याआधी मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती. पण त्याला दिलासा मिळाला नव्हता. कोर्टाने सोनू सूदला हायकोर्टात जाण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला होता. तीन आठवडे उलटले असून सोनू सूदने अद्याप केलेले बदल दुरुस्त केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआरटीपी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.



हेही वाचा -

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पून्हा समन्स



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा