हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी


हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम दिलेल्या कंपनीचा संचालक नीरजकुमार देसाईला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. 


चुकीचा अहवाल 

 डीडी देसाई असोसिएट इंजिनिअर कन्सलटन्सी अँड अॅनालिस्लाट प्रा. लिमिटेड कंपनीला हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम दिलं होतं. पुलाच्या डागडुजीबाबत चुकीची माहिती देेेत, दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीचा संचालक नीरजकुमार देसाईला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. देसाईवर चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मंगळवारी देसाईला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने देसाईला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून अटक आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



हेही वाचा - 

हिमालय पूल दुर्घटना : स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

इंडियन आयडाॅल अवंती पटेलला पावणे २ लाखांचा गंडा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा