बोगस काॅलसेंटर टोळीचा पर्दाफाश, ६ जणांना अटक

मुंबईतून औषध, नोकरीच्या नावाखाली नागरिकांशी संपर्क साधून त्यांना खोट्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ही टोळी फसवणूक करायची.

बोगस काॅलसेंटर टोळीचा पर्दाफाश, ६ जणांना अटक
SHARES

मुंबईतून बेकायदेशीरित्या बोगस काॅलसेंटर चालून अमेरिका आणि कॅनडाच्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखे ‘सीआययू’च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फैजान इम्तियाझ बालम, झिहान अन्सारी, गणेशसिंह राजपूत, मोहम्मद करिपोडी, नितीन राणे, ओझिर सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि बेकायदेशीर खरेदी डेटाबेस जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ‘सीआययू’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचाः- Maratha Reservation: मराठा समाजाला भडकविण्याचं काम कुणी करू नये- उद्धव ठाकरे

मुंबईतून औषध, नोकरीच्या नावाखाली नागरिकांशी संपर्क साधून त्यांना खोट्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून त्यांच्या बॅक खात्याची माहिती मिळवून ही टोळी फसवणूक करायची. या घटनेची कूणकूण गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला.  या पूर्वी गुन्हे शाखेच्या ‘सीआययू’च्या पोलिसांनी एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून फेक फाॅलोअर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी काही अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या नावानेही हा गैरप्रकार सुरू होता. तर काही सेलिब्रिटींचीही चौकशी सीआययूच्या पोलिसांनी केली होती.

हेही वाचाः- भुजबळ होम क्वारंटाईन, विश्वजीत कदम कोरोना पाॅझिटिव्ह

तसेच यापूर्वी दिल्लीमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर चालवणाऱ्या २ जणांना अटक करण्यात आली होती. आरिफ अब्दुल रशीद (२४) आणि सुजहुद सुहेलहुद (२५) अशी या दोघांची नावं असून ते दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असणाऱ्या शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. आरोपी उच्च पगाराच्या नोकऱ्या ऑफर करत होते. मात्र ऑफर लेटर आणि इतर फॉर्मालिटीज पूर्ण करण्यासाठी पैसे मागत असतं. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या महिलेला आरोपींनी नोकरी देतो असे सांगून ४० हजार चा गंडा घातला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा