राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मंत्री छगन भुजबळ हेदेखील होम क्वारंटाइन झाले आहेत. तर तर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचं शुक्रवारी सकाळी स्पष्ट झालं. (maharashtra cabinet minister chhagan bhujbal home quarantine and state minister vishwajit covid positive)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत ६ अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे. तसंच या विभागचे मंत्री छगन भुजबळ हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घेण्याचं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
हेही वाचा- सुट्टीसाठी डॉक्टर 'असा' करणार निषेध
तर, विश्वजीत कदम यांना ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. कदम आपल्या त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर तिथंच उपचार सुरू आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देऊन आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. याआधी विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना करोनाची लागण झाली होती.