चित्रपट निर्माते करीम मोरानींना बलात्कार प्रकरणी अटक


चित्रपट निर्माते करीम मोरानींना बलात्कार प्रकरणी अटक
SHARES

बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांनी शनिवारी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. एका महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप करीम मोरानी यांच्यावर आहे. दामिनी, राजा हिंदुस्थानी, रावन, चैन्नई एक्स्प्रेस अशा गाजलेल्या सिनेमांची निर्मिती करीम मोरानी यांनी केली आहे.

पीडित महिला ही दिल्लीची रहाणारी असून मुंबई आणि हैदराबाद या ठिकाणी मोरानी यांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. सदर महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मोरानी यांच्याविरोधात बलात्कार, अपहरण, धमकी देणे असे गुन्हे दाखल केले आहेत.


लग्नाचंही खोटं आश्वासन...

पीडित महिलेच्या दाव्यानुसार, तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र मोरानी यांनी तिला खोटं आश्वासन देऊन दिल्ली, मुंबई, हैदराबाद अशा विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्याशिवाय आपल्याला मोरानीने लग्नाचं खोटं आमिषही दाखवल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.

मोरानी हे सिनेयुग प्रोडक्शनचे संस्थापक असून अभिनेता शाहरुख खान याच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे. शिवाय 2 जी घोटाळा प्रकरणीही मोरानींना अटक झाली होती.



हेही वाचा

सोशल मीडिया मायरा खानला म्हणतो 'पाक से दफा हो जाओ'!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा