मालेगाव बाॅम्बस्फोट: आरोप निश्चितीची सुनावणी सोमवारी

रोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 'एनआयए'च्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. या याचिकेवर निर्णय येईपर्यंत ३० ऑक्टोबरपर्यंत 'यूएपीए' अंतर्गत आरोप निश्चितीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

मालेगाव बाॅम्बस्फोट: आरोप निश्चितीची सुनावणी सोमवारी
SHARES

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी 'एनआयए'च्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं हाेतं. पुरोहित यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.


काय होता निर्णय?

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) आरोप निश्चिती करून खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयाला पुरोहित यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र 'एनआयए'च्या विशेष न्यायालयाने २० ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत 'यूएपीए' अंतर्गत खटला चालवण्याचा निर्णय योग्य ठरवला होता.


आरोप निश्चितीला स्थगिती

त्यामुळे अखेर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 'एनआयए'च्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. या याचिकेवर निर्णय येईपर्यंत ३० ऑक्टोबरपर्यंत 'यूएपीए' अंतर्गत आरोप निश्चितीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.


सुनावणी पुढे ढकलली

या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार होती. परंतु न्यायमूर्ती अनुपस्थितीत असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तर शुक्रवारी काही आरोपी अनुपस्थित असल्याने ही सुनावणी सोमवार २९ आॅक्टोबरला घेणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सोमवारच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून असणार आहे.



हेही वाचा-

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कर्नल प्रसाद पुरोहितांचा फैसला २७ डिसेंबरला!



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा