कर्नल प्रसाद पुरोहितांचा फैसला २७ डिसेंबरला!

मालेगाव ब्लास्टमधील आरोपी असलेले लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा फैसला २७ डिसेंबरला होणार आहे. २७ डिसेंबरला मुंबईतील विशेष एनआयए कोर्ट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांवर मालेगाव ब्लास्ट प्रकरणी आरोप निश्चित करेल.

कर्नल प्रसाद पुरोहितांचा फैसला २७ डिसेंबरला!
SHARES

मालेगाव ब्लास्टमधील आरोपी असलेले लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा फैसला २७ डिसेंबरला होणार आहे. २७ डिसेंबरला मुंबईतील विशेष एनआयए कोर्ट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांवर मालेगाव ब्लास्ट प्रकरणी आरोप निश्चित करेल. गुरुवारी झालेल्या सुनावणीत विशेष एनआयए कोर्टाने फैसल्याची तारीख निश्चित केली असून, त्याला कर्नल प्रसाद पुरोहित तसेच समीर कुलकर्णी उपस्थित होते.

२९ सप्टेंबर २००८ साली मालेगावात झालेल्या बॉम्ब स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८० हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ११ जणांना अटक केली होती.


याआधीही फेटाळली याचिका

यापूर्वी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कर्नल पुरोहित आणि कुलकर्णी यांची आरोपातून मुक्तता करण्याची याचिका फेटाळून लावली होती. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांनी त्यांच्यावर यु. ए. पी. ए. (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपातून सुटका करण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण हे युएपीए कोर्टात प्रलंबित आसल्याने आपण हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशी भूमिका घेत कोर्टाने याचिका फेटाळली होती.

आरोप ठेवण्याअगोदर सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता असते. त्याची पूर्तता न केल्याने आपली आरोपातून मुक्तता करण्यात यावी, अशी याचिका कर्नल पुरोहित आणि कुलकर्णी यांनी केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यालयाने कर्नल पुरोहित आणि कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला होता.



हेही वाचा

मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा कट? आग्रा महामार्गावर मोठा शस्त्रसाठा जप्त!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा