हिमालय पूल दुर्घटनेतील आरोपी तुरूंगाबाहेर, आॅडिटरचाही समावेश

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणातील आरोपी स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाई आणि मुंबई महापालिकेच्या ३ माजी अधिकाऱ्यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या चौघांना मार्च-एप्रिल महिन्यात पोलिसांनी अटक केली होती.

हिमालय पूल दुर्घटनेतील आरोपी तुरूंगाबाहेर, आॅडिटरचाही समावेश
SHARES

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणातील आरोपी स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाई आणि मुंबई महापालिकेच्या ३ माजी अधिकाऱ्यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या चौघांना मार्च-एप्रिल महिन्यात पोलिसांनी अटक केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेकडून बद्रुद्दीन तय्यबजी लेनला जोडणारा फूट ओव्हर ब्रिज हिमालय पूल म्हणून ओळखला जात असे. हा पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळल्याने त्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० जण गंभीर जखमी झाले होते. 

हेही वाचा- हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांना सादर

या पुलाचं स्ट्रक्चरल आॅडिट होऊन देखील हा पूल कोसळल्याने मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत हालचाली करत या पुलाचं स्ट्रक्चरल आॅडिट करून पूल सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र देणारा आॅडिटर नीरज देसाई आणि महापालिकेच्या पूल दुरूस्ती विभागातील कर्मचाऱ्यांवर कामात बेपर्वाई केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देसाई याच्यासह संदीप काकुळते, अनिल पाटील, शीतलाप्रसाद कोरी यांना मार्च-एप्रिल महिन्यांत अटक केली. तेव्हापासून हे सर्व आरोपी तुरूंगात होते.

हेही वाचा- हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादर

त्यानंतर या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता न्या. एस. के. शिंदे यांनी आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा