हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांना सादर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

प्राथमिक अहवाल

हिमालय पूल दुर्घटनेनंतर या दुर्घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी महापालिकेचे उपायुक्त (दक्षता) विवेक मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानुसार मोरे यांनी २४ तासांच्या आत दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला होता. 

या अहवालात महापालिकेचे अभियंता अनिल पाटील, संदीप काकुळते आणि अन्य काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. अहवालानंतर पुलाचं स्ट्रक्चरल आॅडिट करणारे नीरज देसाई यांना अटक करण्यात आली. पाटील तसंच काकुळते यांना निलंबित करून त्यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पूल विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांनाही अटक करण्यात आली.  

चौकशीची शिफारस

महापालिकेने मुंबईतील पादचारी पूल, उड्डाणपुलांची तपासणी करण्याकरीता नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांनी हिमालय पूल सुस्थितीत असून पुलाला केवळ किरकोळ दुरूस्तीची गरज असल्याचा अहवाल दिला होता. परंतु हा पूल कोसळल्यावर या तांत्रिक सल्लागारांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्तांना मुंबईतील पुलांची फेरतपासणी करण्याचे आदेश द्यावे लागले.  

अंतिम अहवालात देखील ठपका ठेवण्यात आलेल्या अभियंत्यांना वगळता अन्य कुणाच्याही नावाचा समावेश करण्यात आलेला नाही, असं समजत आहे. या अहवालात केवळ ठपका ठेवण्यात आलेल्या अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हेही वाचा-

महापालिकेच्या डोळ्यावर झापड कायम, मुंबईतील पुलांचं ऑडिट पुन्हा देसाईकडे

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादरसंबंधित विषय
ताज्या बातम्या