कोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक

मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचे म्हटले. तसेच जगभरात त्यांची वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात,

कोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक
SHARES

कोरोना संकटात नागरिकांच्या संरक्षणासाठी  रस्त्यावर उतरून मुंबई पोलिसांनीआपली चोख भूमिका पार पाडली. या दरम्यान पोलिस नागरिकांच्या थेट संपर्कात आल्याने त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. यात २८० पोलिस शहिद झाले. मात्र तरीही  कोरोनाची भयंकर परिस्थिती असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतूक केले आहे.

हेही वाचाः-मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने गुरुवारी मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचे म्हटले. तसेच जगभरात त्यांची वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात, असेही मत त्यांनी नोंदवले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने आखलेल्या नियमांचे उलंघन होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस अहोरात्र मेहनत घेत होते. कोरोनाचे संकट असतानाही मुंबई पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडल आहे. यामुळे मुबंई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. साथीरोगाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी खूप कठीण होती.

हेही वाचाः- प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर

मुंबई पोलीस आधीच खूप तणावात आहेत. त्यांना १२-१२ तास ड्युटी करावी लागते. त्यानंतर येथे मिरवणूक, मोर्चे यांचा बंदोबस्त देखील असतो, अशा विपरीत परिस्थितीत मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते, असे न्यायमूर्ती शिंदे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील २६हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यापैकी २४ हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १ हजार ५१७ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.

Read this story in English
संबंधित विषय