तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे.तरीही सरकारी तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असल्याने तपासाच्या गतीवरुन गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना फटकारलं.

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांना सुनावलं
SHARES

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? तुमच्याकडे गृहखात्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाची खाती आहेत, तेव्हा कार्यक्षमताही दाखवा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावलं. काॅम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने सरकारी तपास यंत्रणांना धारेवर धरलं.

पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यापाठोपाठ काॅम्रेड गोविंद पानसरे यांची देखील त्याच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणात दोन्ही कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली.

कुटुंबीयांच्या मागणीनुसार दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे.तरीही सरकारी तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असल्याने तपासाच्या गतीवरुन गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना फटकारलं.

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र एसआयटी अजूनही खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. फरार आरोपींवरील बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याने लोक आरोपीला पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच असते.

कनिष्ठ अधिकाऱ्यांना तपासात अपयश येतं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालायला हवं. त्यामुळे दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, सचिव आदींनी विशेष लक्ष द्यायला हवं, असं मतंही कोर्टाने व्यक्त केलं.



हेही वाचा-

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका

नालासोपारा प्रकरण : तपास संथगतीने करण्याचा मुख्यमंत्र्याचा आदेश?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा