Advertisement

नालासोपारा प्रकरण : तपास संथगतीने करण्याचा मुख्यमंत्र्याचा अादेश?

इंडिया स्कूप डॉट कॉमच्या अहवालानुसार, नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आला अाहे. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता हे स्पष्ट आहे.

नालासोपारा प्रकरण : तपास संथगतीने करण्याचा मुख्यमंत्र्याचा अादेश?
SHARES

नालासोपारा प्रकरणातील सनातन संस्थेशी संबंधीत अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचा तपास दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून सुरू अाहे. या प्रकरणाचा तपास संथगतीने करण्याचा अादेश दहशतवाद विरोधी पथकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचा दावा इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटने प्रसिध्द केलेल्या अहवालात केला अाहे. या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत?

इंडिया स्कूप डॉट कॉमच्या अहवालानुसार, नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आला अाहे. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता हे स्पष्ट आहे. याचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच

सखोल चौकशी झाल्यास अनेक बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते. असं झाल्यास भाजप सरकार हिंदूविरोधी आहे असा संदेश जाईल म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या तपासावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास संथगतीने
करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत, असं या अहवालात म्हटलं अाहे.


पोलिसांचं सहकार्य नाही

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातही महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक कर्नाटक एसआयटीला सहकार्य करत नाही, असंही इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटच्या दुसऱ्या अहवालात म्हटलं आहे. हे सत्य असेल तर ही अतिशय गंभीर बाब अाहे.  या प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छाशक्ती नाही असंच दिसतं असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं अाहे.


भिडेंची चौकशीही नाही

नालासोपारा बॉम्बसाठा प्रकरणात संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधीत लोकांना अटक करण्यात आली आहे. पण दहशतवाद विरोधी पथकाने अद्याप संभाजी भिडेंची साधी चौकशीही केली नाही. तसंच सनातनच्या साधकांना अटक करण्यात आल्यानंतरही सनातनच्या जयंत आठवलेंचा साधा जबाबही पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळे सदर वेबसाईटचा अहवाल सत्य असल्याची शक्यता अधिक दिसते. या प्रकरणातल्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत हा तपास पोहोचेल की नाही, अशी शंकाही सावंत यांनी व्यक्त केली.



इंडिया स्कूपच्या संबंधीत अहवालाच्या लिंक 

http://forums.indiascoops.com/karnataka-sit-alleges-maha-ats-going-slow-on-probe-contradicts-maha-ats-report-in-gauri-lankesh-murder/

http://forums.indiascoops.com/karnataka-sit-alleges-maha-ats-going-slow-on-probe-contradicts-maha-ats-report-in-gauri-lankesh-murder/



हेही वाचा-

'वर्गाबाहेचे विद्यार्थी', राज ठाकरेंनी मोदी-शहांना व्यंगचित्रातून फटकारले

वाढते परप्रांतीय मुंबईची समस्या - वित्त आयोग




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा