पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या संपत्तीचा आज प्रभादेवी येथे सॅफरनआर्टद्वारे केला जाणार आहे. मात्र हा लिलाव थांबवण्यासाठी आता निरव मोदीच्या मुलाने न्यायालयात धाव घेतली आहे. नीरव याच्या संपत्तीचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहे. नीरव याचा मुलगा रोहिन मोदी याने कोर्टात यानी एक याचिका दाखल केली आहे.
हेही वाचाः-पुरुषाच्या 'स्पर्शा'मागचा हेतू स्त्रियांना कळतो : कोर्ट
निरव विरोधात २०१८ मध्ये मे आणि जुलै महिन्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी नीरव मोदी याच्या प्रत्यर्पणासाठी आग्रह केला होता. ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र घोटाळ्यातील देणेकऱ्याचे पैसे भागवण्यासाठी न्यायालयाच्या परनगीने नीरवची मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावर आता नीरवच्या मुलाने आक्षेप नोंदवत न्यायालयात लिलाव थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. रोहिन मोदी याने याचिकेत असा दावा केला आहे की, ईडीकडून ज्या महागड्या पेंटिंग्स जप्त केल्या आहेत त्या वडिलांच्या नसून रोहिन ट्रस्टच्या आहेत. रोहिन या ट्रस्टचे प्रमुख आहेत. रोहिन याने हायकोर्टाला ईडी आणि खासगी लिलाव संस्था सॅफरनआर्ट यांना ५ मार्चला होणारा लिलाव थांबण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश बीपी धर्माधिकारी आणि न्यायाधीश एआर बोरकर यांच्या खंडपीठाकडून यावर आज सुनावणी करण्यात येणार आहे.हेही वाचाः- मुंबई विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधून ६५,६२१ प्रवाशांची तपासणी
दरम्यान, १५ मौल्यवान पेटिंग्ससह हिरेजडीत घड्याळ, हॅंन्ड बॅग आणि काही महागड्या कार यांची लाईव्ह आणि ऑनलाईन पद्धतीने लिलावात झळकवणार आहेत. लंडन मधील तुरुंगात नीरव मोदी याला ठेवण्यात आले आहे. तसेच मेहुल चोक्सी याच्यावर पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने नीरव मोदी याचे मुंबईतील बंगल्यांमधील महागड्या वस्तू जप्त केल्या असून त्यांचा लिलाव ५ मार्चला होणार आहे.