मराठी बोलण्याच्या वादावरून तरूणाची आत्महत्या

कल्याण पूर्व येथील तीसगाव नाका परिसरातील ही मन सुन्न करणारी घटना आहे. अर्णव खैरे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मराठी बोलण्याच्या वादावरून तरूणाची आत्महत्या
SHARES

कल्याणमधून (kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये झालेल्या वादातून मानसिक तणावात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

कल्याण पूर्व येथील तीसगाव नाका परिसरातील ही मन सुन्न करणारी घटना आहे. अर्णव खैरे असं आत्महत्या (suicide) केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अर्णव मुलुंड (mulund) येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला, त्यावरून काही प्रवाशांशी त्याचा वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हिंदी-मराठी भाषिक वादापर्यंत पर्यंत पोहोचल.

या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरे याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणी नंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी याबाबत सांगितलं की, ट्रेनमधून कॉलेजला जात होता. ट्रेनमध्ये धक्का लागल्याने त्याने हिंदीतून समोरच्या व्यक्तीला पुढे सरकण्यास सांगितलं.

यावेळी एका प्रवाशाने थेट अर्णवच्या कानशिलात लगावली. तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता.

ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव मारहाण तर केलीच शिवाय धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असातानाही तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं, असं त्याच्या वडिलांना सांगितलं.

माझा मुलगा तर गेला, मात्र असे प्रकार पुढे घडू नयेत. भाषेवरून वाद (arguement) होऊ नयेत, असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलं. जितेंद्र खैरे यांच्या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.



हेही वाचा

“ठाकरे बंधू एकत्र आले तरी परिणाम शून्य”: अमित साटम

पश्चिम आणि मध्य रेल्वे विशेष लोकल चालवणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा