फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

 Girgaon
फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

गिरगाव - गिरगावमधल्या भद्रन हाउस पुनर्विकास प्रकल्पात वर्धन बिल्डरने फसवणुक केल्याचा प्रकार उघड झालाय. वर्धन बिल्डरने या पुनर्विकास प्रकल्पामध्ये भवरलाल जैन यांच्यासोबत ८0 चौ. फूट अतिरिक्त जागा देण्याचा करार केला होता. त्यासाठी भवरलाल जैन यांनी ८ लाख ८२ हजार रुपये दिले होते. पण बिल्डरनं जैन यांना अनधिकृत बांधकाम केलेल्या जागेतला गाळा दिला. या गोष्टीला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिल्यावर ही गोष्ट जैन यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी व्ही.पी.रोड पोलीस स्टेशनमध्ये राजेश आणि दिलीप वर्धन बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Loading Comments