'१५ दिवसांत ५० कोटी भरा', डीएसकेंना कोर्टाचे आदेश

वादात अडकलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना १५ दिवसांत 50 कोटी रुपये कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे भरणे बंधनकारक असून असे न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

'१५ दिवसांत ५० कोटी भरा', डीएसकेंना कोर्टाचे आदेश
SHARES

वादात अडकलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना १५ दिवसांत 50 कोटी रुपये कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे भरणे बंधनकारक असून असे न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी डीएसकेंनी 50 कोटी रुपये जमा करण्याचे अखेर मान्य केले आहे.

सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावाणीत डीएसकेंच्या वाकिलांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असून 50 कोटी रूपये भरण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदत मागितली होती. सध्या आमची खाती गोठवण्यात आली असून, आम्ही कोणतीही मालमत्ता विकू शकत नसल्याची सबब यावेळी डीएसकेंच्या वकिलांनी दिली.

डीएसकेंना आणखीन मुदत वाढ देऊ नये, असं सांगत डीएसकेंनी मार्च महिन्यात 40 कोटींची मालमत्ता विकली. त्याचबरोबर ज्यावेळी डीएमकेवर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशी देखील 2 मालमत्ता विकल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. या तिन्ही मालमत्ता विकून मिळालेल्या पैशांनी डीएसकेंनी तात्काळ 50 कोटी रुपये जमा करण्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले.

कोर्टाने डीएसकेंची बाजू उचलून धरत त्यांना शेवटची संधी दिली आहे. पुण्यातील शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडवल्याप्रकारणी डीएसके कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल असून, पुणे पोलिस सध्या याचा तपास करत आहेत. पुणे कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर डीएसकेंनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. पुण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई आणि कोल्हापुरात देखील डीएसकेंच्या ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा