इक्बाल कासकर खंडणी प्रकरण: चौकशी सुरू असलेल्या बिल्डरचा मृत्यू


इक्बाल कासकर खंडणी प्रकरण: चौकशी सुरू असलेल्या बिल्डरचा मृत्यू
SHARES

इक्बाल कासकर खंडणीप्रकरणात चौकशी सुरू असलेल्या एका बिल्डरचा चौकशीनंतर अचानक मृत्यू झाला आहे. फरीद मोहम्मद अली वेल्डर असं या बिल्डरचं नाव असून तो ५९ वर्षांचा होता. 

इक्बालने फरीदला १० लाख रुपये दिल्याचं समोर आल्यावर फरीदची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत एका प्रोजेक्टमधील प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी इक्बालनं बुकिंग अमाऊंट दिल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.    


हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर फरीदला प्रिंस अली खान रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नागपाडा परिसरातील अनेक प्रोजेक्ट्सशी फरीद जोडलेला होता.  


माझे वडील त्यांच्या बिजनेसबद्दल आम्हाला कधी काहीही सांगत नसत, त्यांची चौकशी झाली हे देखील मला माहीत नव्हतं, मला या प्रकरणात कुणाविरोधातही तक्रार करायची नाही. 

- फुकरान, फरीद वेल्डरचा मुलगा


मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बिल्डर्स, ज्वेलर्सकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर सध्या ठाणे खंडणीविरोधी शाखेच्या ताब्यात असून त्याच्यावर आतापर्यंत खंडणीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह त्याचा भाऊ अनिस आणि दाऊदचा राइट हँड छोटा शकील यांना प्रत्येकी एका गुह्यात आरोपी बनवण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

खंडणी प्रकरणात इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा