सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, दिवसभरात चोरीच्या ८ घटना

काल दिवसभरात घडलेल्या बहुतांश गुन्ह्यात आरोपींनी माॅर्निक वाॅक निमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष केले असल्याचे दिसले.

सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, दिवसभरात चोरीच्या ८ घटना
SHARES

मुंबईत कोरोना संक्रमाणामुळे सर्वत्र लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर मुंबईचे रस्ते पोलिसांच्या कारवाईच्या भितीने सुमसाम झाले होते. त्याचा परिणाम मुंबईतल्या गुन्हेगारीवरही पडला. मुंबईतली गुन्हेगारी ६० टक्क्यांनी कमी झाली होती.  मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सरकारने अनलाँकडाऊनची घोषणा केली आणि सर्वत्र पूर्वरत झाले. ही संधी साधून आता बोळात लपून बसलेले सोनसाखळी चोरांनी पून्हा डोकं वर काढले आहे. सोमवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ८ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याचे असल्याचे पुढे आले आहे. यातील फक्त तीन गुन्ह्यात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचाः- WhatsApp चं नवीन फिचर्स, ७ दिवसांनंतर आपोआप डिलीट होणार मेसेज

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईत लाॅकडाऊनमुळे पावला पावलावर पोलिस तैनात होते. मात्र लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मुंबईत आता पून्हा सोनसाखळी चोरांनी डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत सोनसाखळी चोरीच्या तब्बल ८ घटना घडल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या सोनसाखळी चोरांना लगाम लावण्यासाठी ठिक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. पश्चिम उपनगरात सर्वाधित सोनसाखळीच्या घटना घडत आहेत. काल दिवसभरात मालाड, मुलुंड, अंधेरीत दोन घटना, जुहू, पायधुनी, विक्रोळी, शिवडी, विलेपार्ले पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील फक्त पायधुनी, शिवडी आणि मालाड येथील गुन्ह्यात सोनसाखळी चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मालाड येथील घटनेत आरोपी इमरान युसुफ अन्सारी(३५)ने पहाटे ६ च्या सुमारास महिला पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात जात असताना. तिचा पाठलाग करून तिची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. मात्र महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर काही अंतरावर स्थानिकांनी आरोपी इमरानला   पकडून त्याची धुलाई केली. पब्लिक धुलाईत इमरानचा चेहरा मोहरा बदलला. त्याच्यावर सध्या कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः- २४ तासांच्या आत महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश

तर शिवडी चांदणीचौक येथील घटनेत आरोपी अहमद कालसेकर (२२) आणि त्याच्या साथीदाराने २० वर्षीय तरुणाला रस्त्यात गाठत, त्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील चैन आणि खिशातील पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीवेळी तेथील उपस्थित नागरिक त्या तरुणाच्या मदतीला आल्याने कालसेकर सापडला. मात्र त्याचा साथीदार पळून गेला. अहमद हा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात या पूर्वीही नागपाडा, काळाचौकी, डीबीमार्ग, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पायधुनी पोलिसांनी रहिम अब्दुल रहिम शेख याला सोनसाखळी चोराला अटक केली आहे. काल दिवसभरात घडलेल्या बहुतांश गुन्ह्यात आरोपींनी माँर्निक वाँक निमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष केले असल्याचे दिसले. त्यामुळे माँर्निक वाँकला जाताना विशेषता महिलांनी काळजी घ्यायला हवी. या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता गस्त वाढवली असल्याचे सांगितले जात आहे.   

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा