Advertisement

WhatsApp चं नवीन फिचर्स, ७ दिवसांनंतर आपोआप डिलीट होणार मेसेज

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये कोणताही मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होणार आहे.

WhatsApp चं नवीन फिचर्स, ७ दिवसांनंतर आपोआप डिलीट होणार मेसेज
SHARES

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये कोणताही मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे.

 Disappearing messages असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्हीमध्ये वापर करता येणार आहे. हे फिचर एकदा इनेबल केल्यानंतर कोणालाही केलेला मेसेज किंवा ग्रुपमध्ये केलेला मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल. परंतु या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर कोणताही परिणाम होणार नाही. मेसेज गायब होण्याआधी आधीच्या चॅट्सला बॅकअप घेतल्यास तुम्ही गुगल ड्राइव्हवर पाहू शकतात. 

जर तुम्ही बॅकअप वरून डिसअपियर मेसेजला रिस्टोर करीत असाल तर असे शक्य नाही. कारण, ते मेसेज डिलीट होतील. व्हॉट्सअॅप युजर्स डिसअपियरींग मेसेजला फॉरवर्ड करण्यासोबत स्क्रीनशॉट करू शकतील. युजर्स डिसअपरियरिंग फोटो आणि व्हिडिओ ला गॅलरीत सेव करू शकतील. यासाठी Save to Camera Roll ऑप्शन असणार आहे. Disappearing Messages फीचर iOS, अँड्रॉयड, KaiOS आणि वेब/डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. हे फीचर बाय डिफॉल्ट व्हॉट्सअॅप मध्ये इनेबल नसणार आहे. युजर्सला मॅन्यूअली इनेबल करावे लागेल.

फिचरची वैशिष्ट्ये

१) कोणत्याही युजरने सात दिवस व्हॉट्सअॅप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल.

२) Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही.

३) Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केला त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही.

४) कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील. त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल.

५) Disappearing मेसेज फिचर ऑन केल्यानंतर चॅट मेसेजप्रमाणे मीडिया फाईल्सदेखील डिलीट होती. परंतु जर त्या फाईल डाऊनलोड केल्या असतील तर त्या फोनमध्ये तशाच राहतील.

                                                                                       


हेही वाचा -

क्रेडिट कार्डवर द्यावे लागतात हे ७ शुल्क, बँका अनेकदा लपवतात माहिती

सिलेंडर डिलिव्हरीचे नवे नियम लागू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा