कुख्यात गुंड एजाज लकडावाला विरोधात दोषारोपपत्र दाखल

एका दिग्दर्शकाला ५०लाखाच्या खंडणी एजाजने मागितली होती. त्या गुन्ह्यात या पूर्वीच दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र एजाजला वाँन्टेंड दाखवण्यात आले होते.

कुख्यात गुंड एजाज लकडावाला विरोधात दोषारोपपत्र दाखल
SHARES

कुख्यात गुंड एजाज लकडावाला विरोधात मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवून त्यात दोषारोपपत्र दाखल केले आहे. एका दिग्दर्शकाला ५०लाखाच्या खंडणी एजाजने मागितली होती. त्या गुन्ह्यात या पूर्वीच दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र एजाजला वाँन्टेंड दाखवण्यात आले होते.

हेही वाचाः-खोट्या अभिरुचीचा खोटा आधार : टीआरपी!

प्रसिद्ध दिग्दर्शक अवतार कोहली यांना २००४ मध्ये गुंड एजाज लकडावालाने ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणी कोहली यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. त्यात एजाजच्या दोन शूटरला पोलिसांनी अटक केली होती. मात्र या गुन्ह्यांत पोलिसांनी एजाला फरार दाखवले होते. दरम्यान एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच 'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. १९९७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता. त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता. एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल ७ ते ८ देशात वावरत होता.

हेही वाचाः- बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!

दरम्यान जानेवारी २०२० मध्ये एका व्यावसायिकाला खंडणीसाठी एजाजने धमकावले. त्यात त्याच्या मुलीनेही त्याला सहकार्य केल्याने निदर्शनास आल्यानंतर एजाज वारंवार मुलीच्यासंपर्कात असल्याचे पुढे आले. एजाजचा ठाव ठिकाणा काढण्यासाठी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याची मुलगी सोनिया हिच्यावर नजर ठेवली. खंडणीच्या त्या गुन्ह्यात मुलीला पोलिस केव्हाही अटक करू शकतात हे लक्षात आल्यानंतर एजाजने मुलीचा आणि नातवाचा बनावट पासपोर्ट बनवला. या पासपोर्टच्या आधारे मुली देश सोडणार तोच पोलिसांनी तिला पकडले. मुलीच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या विविध नंबरमधून तो बिहारच्या पटना येथे लपला असल्याची माहिती २७ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिहार पोलिसांच्या मदतीने खंडणी विरोधाचे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे भाऊ आणि मुलीच्या अटकेनंतर ही एजाज पैशांसाठी व्यावसायिकांना धमकावतच होता. ३ जानेवारी रोजी त्याने खारमधील एका व्यावसायिकाला धमकावले. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढला आणि एजाजचे लोकेशन पोलिसांना कळाले. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजाज पून्हा भारताबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानात मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

हेही वाचाः- मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार

एजाजच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याभोवती फास आवळण्यास सुरूवात केली. त्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात एजाजला अटक दाखवत, त्याचा त्या गुन्ह्यातील सहभाग निश्चित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत आहेत. आतापर्यंत एजाज विरोधात १० गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून लवकरत ३ अन्य गुन्ह्यात त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच एजाज खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांच्या ताब्यात असताना. त्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता तो पूर्णपणे बरा असून पोलिसांच्या निगराणीत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा